breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदी घोटाळा : आयकर विभागाकडे आठ महिने आधीच होती माहिती

पंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रुपयांच्या घोटाळयातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या संशयास्पद व्यवहारांची आयकर खात्याला पूर्ण कल्पना होती. आयकर खात्याने त्यासंबंधी अहवाल देखील तयार केला होता. पण हा अहवाल अन्य कुठल्याही तपास यंत्रणांना देण्यात आला नाही किंवा त्यासंबंधी माहिती देण्यात आली नाही अशी माहिती आता समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघड होण्याच्या आठ महिने आधीच आयकर खात्याने चौकशी करुन हा अहवाल बनवला होता. बनावट खरेदी, मूळ किंमतीपेक्षा स्टॉक्सची जास्त किंमत दाखवणे, बनावट कर्ज आणि नातेवाईकांबरोबर पैशांचे संशयास्पद व्यवहार याची आयकर खात्याला पूर्ण कल्पना होती.

आठ जून २०१७ रोजीच आयकर खात्याने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी संदर्भात १० हजार पानी चौकशी अहवाल तयार केला होता. पण त्यांनी तो फेब्रुवारी २०१८ पर्यंत भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या एसएफआयओ, सीबीआय, ईडी आणि डीआरआय या यंत्रणांसोबत शेअर केला नाही. फेब्रुवारी महिन्यात पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघड झाला.

सूत्रांच्या माहितीनुसार आयकर खात्याने फेब्रुवारी २०१८ पर्यंत त्यांच्याकडे असलेली माहिती प्रादेशिक आर्थिक गुप्तचर परिषदेलाही कळवली नाही. विविध तपास यंत्रणांमध्ये माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी आरईआयसीची स्थापना करण्यात आली आहे.

मोदी आणि चोक्सीने डायमंड आर यूएस, सोलार एक्सपोर्टस आणि स्टीलकर डायमंड या तीन कंपन्यांच्या माध्यातून पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा घोटळा केला. हा घोटाळ उघड होण्याच्या काही आठवडे आधी जानेवारी २०१८च्या पहिल्या आठवडयात मोदी आणि चोक्सी दोघे देशसोडून पसार झाले.

आयकर खात्याने १४ जानेवारी २०१७ रोजी नीरव मोदीच्या कंपन्यांवर छापे मारुन तपास केला होता तसेच मेहुल चोक्सीच्या मालकीच्या कंपन्यांचे सर्वेक्षण केले होते. मोदी आणि चोक्सीच्या देशभरातील ४५ रहिवाशी आणि व्यावसायिक ठिकाणांवर ही शोध मोहिम राबवण्यात आली होती.

म्हणून भारतात परतण्यास नकार

नीरव मोदीने भारतात परतण्यास नकार दिला आहे. भारतात परतल्यास आपल्याला ठेचून मारले जाईल अशी नीरव मोदीला भिती वाटते. त्यामुळे तो भारतात येणार नाही असे नीरव मोदीच्या वकिलाने शनिवारी विशेष न्यायालयाला सांगितले. ईडीने नीरव मोदीच्या वकिलांचा हा दावा फेटाळून लावला. भारतात परतल्यास आपल्या सुरक्षेला धोका आहे असे नीरव मोदीला वाटत असेल तर त्याने पोलिसात तक्रार दाखल करावी असे ईडीने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button