breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलांना महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी ५०८ कोटी दिले; ED चा दावा

नवी दिल्ली : महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांनी आतापर्यंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिले आहेत, असा दावा सक्तवसुली संचलनालयाने केला आहे. ईडीच्या या दाव्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या छत्तीसगडमधील काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री बघेल चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना कथितरीत्या ५०८ कोटी रुपये पोहोचवणाऱ्या असीम दास याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त केल्यानंतर ईडीने त्याला अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महादेव अ‍ॅप आणि त्याच्या प्रवर्तकांची सध्या चौकशी चालू आहे.

हेही वाचा – ‘सरकारने ताणून धरलं तर..’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा 

भूपेश बघेल यांनी महादेव अ‍ॅपकडून ५०८ कोटी मिळाल्याचा ईडीचा दावा स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, मी पूर्वी म्हणाल्याप्रमाणे भाजप ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआय यासारख्या संस्थांच्या मदतीने छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवू पाहत आहे. हा निवडणुकीपूर्वी माझी प्रतिमा मलिन करण्याचा हीन प्रयत्न आहे. महादेव अ‍ॅपह्णचा कथित तपास करण्याच्या नावावर ईडीने आधी माझ्या निकटवर्तीयांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर घरावर छापे टाकले आणि आता एका अज्ञात व्यक्तीच्या जबाबाच्या आधारे माझ्यावर ५०८ कोटी घेण्याचा आरोप करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button