breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मरिन ड्राइव्ह @ १०३… जाणून घ्या या जागेबद्दलच्या १२ रंजक गोष्टी

मरिन ड्राइव्ह… हे दोन शब्द पुरेसे आहेत एखाद्या मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी. मुंबईतील सर्वात लोकप्रिय जगांपैकी एक असणाऱ्या मरिन ड्राइव्हला आज १०३ वर्षे पूर्ण झाली. मरिन ड्राइव्हला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबाबरोबर ‘प्लॅन’ करुन गेला नाही असा अस्सल मुंबईकर सापडणे कठीण. पावसाळ्यात मरिन ड्राइव्हच्या कठड्याला धडकणाऱ्या काही फुटांच्या लाटा असो किंवा वानखेडेवर भारताने मिळवलेला विश्वचषक सर्वच गोष्टींचा हा जगप्रसिद्ध कट्टा साक्षीदार आहे. बरं अनेकांसाठी हा हक्काचा कट्टा आहे. म्हणजे अगदी कॉलेज बंक मारण्यापासून ते मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांपर्यंत आणि ऑफिसला जाणाऱ्यांपासून ते फक्त मरिन ड्राइव्ह बघायला आलेल्यांपर्यंत अनेकजण एकाचवेळी येथे सापडतात. याच मुंबईकरांच्या हक्काच्या जागेला आज १०३ वर्षे पुर्ण झाली आहेत. त्याचनिमित्त जाणून घेऊयात या जागेबद्दलच्या काही खास गोष्टी…

>१८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. यावेळी तेथे उभारण्यात आलेल्या दगडावरील मजकूर होता ‘केनडी सी-फेसच्या बांधकामाची सुरुवात १८ डिसेंबर १९१५.’

>मरिन ड्राइव्ह संपूर्णपणे बांधण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला आणि १९२० साली हे बांधकाम सुरु झाले. काम पूर्ण झाल्यानंतर गिरगाव चौपाटीजवळील त्याच दगडावर ‘केनडी सी-फेसच्या बांधकामाची सुरुवात १८ डिसेंबर १९१५. बांधकाम पूर्ण झाले १९२०.’ हे शब्द लिहिण्यात आले.

>ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यामुळे ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्यांना ताज्या हवा देण्यासाठी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून कठडा आणि पाथ-वे बांधण्याचा निर्णय घेतला.

>मरिन ड्राइव्हचा रस्ता बांधण्याचा दुसरा मुख्य उद्देश होता नरिमन पॉइण्ट ते अॅनटॉप हिल परिसराच्या पायथ्याशी असणारा बाबुलनाथ हा परिसर रस्ते मार्गाने जोडणे.

>४४० एकर भूभागावर भराव टाकून गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत ३.६ किमीचा पाथ-वे पूर्ण झाला. त्यालाच आज आपण मरिन ड्राइव्ह म्हणतो.

>१९२० साली बांधून पूर्ण झालेल्या मरिन ड्राइव्हला पहिल्या ७२ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या डागडुजीची गरज पडली नाही.

>मरिन ड्राइव्हचा आकार वक्राकार आहे. या रस्त्यावर रात्री प्रकाशदिवे लागल्यावर आकाशातून ही प्रकाश दिव्यांची रांग गळ्यातील एखाद्या हाराप्रमाणे दिसते म्हणून याचा क्विन्स नेकलेस असं म्हणतात.

>मरिन ड्राइव्हच्या रस्त्यासाठी क्विन्स नेकलेस हा शब्दप्रयोग १९३० च्या दशकापासून करण्यात येऊ लागला.

>मरिन ड्राइव्हच्या कठड्यावर सतत लाटा धडकत असल्याने हा लाटांचा मार शोषण्यासाठी संपूर्ण परिसरात ट्रायपॉड्सचा वापर करण्यात आला आहे. या दगडांवर बसून अनेक पर्यटक फोटो काढताना दिसतात. मरिन ड्राइव्हरील या ट्रापॉड्सची एकूण संख्या साडेसहा हजारहून अधिक आहे.

>आज हा संपूर्ण रस्ता मरिन ड्राइव्ह नावाने लोकप्रिय असला तरी त्याचे आधीचे नाव सोनापूर असे होते. सामन्यपणे ज्या रस्त्याला मरिन ड्राइव्ह असं म्हटलं जातं त्या रस्त्याचं नाव आहे नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग. हा रस्ता मलाबार हिल्सच्या पायथ्याशी असणारा बाबुलनाथ आणि नरिमन पॉइण्ट या दोन भागांना जोडतो.

>२०१४ साली मरिन ड्राइव्हलाच प्रजासत्ताकदिनानिमित्त विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते.

>भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मरिन ड्राइव्हवर कोणत्या प्रकारचे दिवे लावण्यात यावे यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. त्यानुसारच १९५० साली या संपूर्ण परिसरात पिवळ्या रंगाचे पथदिवे लावण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button