breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खासदार अमोल कोल्हेंची उद्या लोणावळ्यात धडाडणार तोफ

राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळकेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा 

पुणे |महाईन्यूज|

राष्ट्रवादी  काँग्रेसचे स्टार प्रचारक डॉ.  अमोल कोल्हे यांची तोफ मंगळवारी मावळात धडाडणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय), स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवारी (दि.15) संध्याकाळी साडेपाच वाजता लोणावळा येथे डॉ.  कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे,  अशी माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषदे शेजारील गुरुद्वारा चौक येथे ही सभा होणार असून या सभेला माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अध्यक्ष एसआरपी रमेश साळवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, अध्यक्ष एसआरपी मावळ बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button