breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महाराष्ट्रात १ दिवसात ४९९ पोलिसांना कोरोनाची लागण

 

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात २४ तासांत ४९९ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात ९५ अधिकारी आहेत. राज्यातील ८२१ अधिकारी आणि ३ हजार २६९ पोलिस कर्मचारी कोरोनाचे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. त्यातील काहीजण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काहीजण होमक्वारंटाईन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. असे असताना पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. एका दिवसात राज्यात ४९९ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले, अशी माहिती बुधवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मार्च २०२० पासून राज्यात कोरोनाचा फैलाव सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील १,८५४ अधिकारी आणि ४० हजार ९५९ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले. आतापर्यंत ४६ अधिकारी आणि ४५९ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

मुंबईतील कोरोना बाधित पोलिसांची संख्या १० हजार ६६६ झाली आहे. १२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मुंबई पोलिस दलात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १,२७३ आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button