breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा तरुणाच्या आत्महत्तेप्रकरणी केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

मराठा आरक्षणाला (Maratha reservation) स्थगीती दिल्यामुळे मराठा तरुणाने केलेल्या आत्महत्याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करत संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, मराठा आरक्षणासाठी आणखी एक तरुणाने आत्मबलिदान केलं आहे. बीड जिल्ह्यातील केतुरा या गावातील विवेक कल्याण रहाडे या मराठा तरुणाने आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे ३० सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी त्याने लिहिलेल्या चिट्ठीत असे म्हंटले आहे कि ‘मी मेल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला कीव येईल आणि मराठ्यांना आरक्षण मिळेल म्हणून मी आत्महत्या करत आहे. विवेक हा बारावी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. पण, याच काळात मराठा आरक्षणावर स्थागिती आल्यामुळे त्याच्या सर्व आशा मावळल्या होत्या. म्हणून त्याला मराठा आरक्षणासाठी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं.

या घटनेला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहेत. विवेक रहाडे या विद्यार्थ्यांची आत्महत्या हे त्याचे एकट्याचे बलिदान नाही. या बलिदानातून आता तरी केंद्र व राज्य सरकारने जागे होऊन विद्यार्थांचे होणारे नुकसान थांबवावे. अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. या आत्महत्येस सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार यांना जबादार धरून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने, सचिव विशाल जरे, संघटक ज्ञानेश्वर लोभे उपस्थित होते.

मराठा तरुणांना आवाहन

मराठा समाजातील तरुण, तरुणींना आत्महत्यासारखे कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आहवान संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे. मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधीना आरक्षण देण्यासाठी सळोकीपळो करून त्यांना आरक्षण देण्यास भाग पाडू. एवढी ताकद मराठा समाजात आहे. मराठा तरुणांच्या आरक्षणाबाबत तीव्र भावना आहेत. परंतु, त्यासाठी आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. न्यायालयाची लढाई चालू आहे. कोणीही हार मानू नये. विश्वास ठेवा, विजय निश्चितच आपला होईल. कृपया आत्महत्येचा विचार करू नका, आपल्या परिवाराचा विचार करावा. काल घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button