breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

100 हून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील, पुण्यात बापट यांनी व्यक्त केला विश्वास

2022 मध्ये होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या वतीने नगरसेवकांच्या बैठकी आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट यांनी आगामी निवडणुकीत भाजप-आरपीआयचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नगरसेवकांच्या बैठकीत त्यांच्याकडून विविध विकासकामांची, उभा राहिलेल्या प्रकल्पांची तसंच अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रकल्पांची माहिती बापट यांनी घेतली. या बैठकीला खा. बापट, पुणे शहर भाजपाध्यक्ष जगदिश मुळिक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी नेते उपस्थित होते.

वाचाःपुण्यात अजित पवार समर्थक नगसेवकाच्या हत्येची सुपारी; गुन्हा दाखल

यावेळी बोलताना बापट म्हणाले की, भाजपचे सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना पुण्यात मोठ्याप्रमाणावर निधी दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातूनही शहरात मोठे प्रकल्प सुरू आहेत.

भामा आसखेड प्रकल्पातील शेतकर्‍यांचे पुनर्वसन केले. यासाठी महापालिकेने सुमारे २०० कोटी रुपये निधी दिला. विमानतळ, नदी सुधार योजना, मेट्रो प्रकल्पाची कामे पुढे नेली, असेही ते म्हणाले.

भाजपने पुणेकरांना दिलेला शब्द पाळला असल्याने, आगामी निवडणुकीमध्ये भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक महापालिकेत असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button