breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा जात प्रमाणपत्र, काढण्यास ही आहेत आवश्यक कागदपत्रे

मुंबई – मोठ्या संघर्षानंतर मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निकाला जाहीर झाला. मराठा समाजातील व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. मराठा जात प्रमाणपत्र कसे काढायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुम्हाला कामाची आहे. या प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि त्याची प्रक्रिया येथे देत आहोत.

संपूर्ण पद्धत ऑनलाइन

प्रत्येक जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रामध्ये यासाठी अर्ज करता येतो. ही संपूर्ण पद्धत ऑनलाइन आहे. अर्ज केल्यापासून हे प्रमाणपत्र 8 ते 10 दिवसांत मिळणार आहे. यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, ही कागदपत्रे खालीलप्रमाणे

१) स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
२) शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट (जन्मतारीख व जातीचा उल्लेख गरजेचा)
३) वडिलांचा जन्म १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापूर्वी झाला असल्यास त्यांचा जातीचा पुरावा म्हणून त्यासाठी खालीलपैकी एक कागदपत्र लागेल.
अ) शाळेचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक).
ब) जन्म-मृत्यूची नोंद असलेला महसूल अभिलेखातील पुरावा.
क) शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचा जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा.
ड) समाजकल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरवलेले जात प्रमाणपत्र.
ई) वडिलांचा जातीचा दाखला नसल्यास तसे शपथपत्र देणे आवश्यक आहे.
४) बहिण-भावांचा शाळा सोडल्याचा दाखला (हिंदू मराठा उल्लेख आवश्यक)
५) वंशावळ
६) महसूल पत्र
७) रहिवासी प्रमाणपत्र
८) रेशनकार्ड
९) आधारकार्ड
१०) एक छायाचित्र

हेही महत्त्वाचे

अर्जावर सर्व माहिती अचूक भरली आहे का ते तपासून पाहा. यानंतर तुमच्या प्रतिज्ञापत्राची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला अर्जावर व प्रतिज्ञापत्रावर शिक्के देऊन सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणण्यासाठी पाठवले जाईल. अर्ज जमा केल्यानंतर त्याची पोचपावती घ्यावी. यावर तुमचा जातीचा दाखला मिळण्याची तारीख दिली जाते. यामुळे ती जपून ठेवा.

विवाहित स्त्रियांसाठी प्रमाणपत्र हवे असल्यास पुढील पुरावे जोडावे

अ) विवाहापूर्वीची जात सिद्ध करणारा कोणताही एक पुरावा
ब) विवाहाचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी दाखला
क) राजपत्रात (Gazette) प्रसिद्ध झालेला नावातील बदल व लग्नपत्रिका किंवा पोलीस यांचा दाखलाही चालेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button