breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जगभरातील शिवकालीन वस्तूंचे संकलन करणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरमध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली आहे.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालीन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादनही केले आहे.

हेही वाचा – ‘‘शासन आपल्या दारी’’ च्या यशस्वीतेसाठी सकारात्म्क योगदान द्या!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापतींवर आधारित टपाल तिकिटांचे प्रकाशन या कालावधीत व्हावे, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यभर महानाट्य ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येतील, असं मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button