breaking-newsमहाराष्ट्र

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा, अमोल कोल्हेंची सरकारला विनंती

मुंबई : राज्य सरकारने तयार केलेल्या थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नाही, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. यामध्ये लक्ष घालून तात्काळ सुधारणा करण्याची विनंतीही अमोल कोल्हे यांनी केली आहे.

“महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी काल रात्री केलं होतं. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री कार्यालय यांना मेन्शन केलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा नामोल्लेख महापुरुषांच्या दिनविशेष यादीत राहिल्याने ते अस्वस्थ झाल्याचं दिसतं.

Dr.Amol Kolhe✔@kolhe_amol

महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी. @CMOMaharashtra @NCPspeaks3,236Twitter Ads info and privacy624 people are talking about this

याआधी, फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंच नाव नव्हतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ प्रदान करुन यथोचित गौरव करण्याची मागणी करणाऱ्या भाजपाला स्वतःची सत्ता असताना मात्र विसर पडला होता. त्यावर, सावरकरांचं नाव चुकून राहिलं असेल, असं लंगडं समर्थन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. ‘राष्ट्रपुरुषांच्या यादीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव असायलाच पाहिजे. ते चुकून राहिले असेल, तर या सरकारने ताबडतोब ही चूक दुरुस्त करावी, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button