breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

मराठा आरक्षण : ‘न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा!’; मराठा आरक्षणावर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर | महाराष्ट्र सरकारने केलेल्या मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीकरिता विशेष निमंत्रित म्हणून संभाजीराजे सहभागी झाले. सुनावणीनंतर त्यांनी सोशल मीडिया द्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संभाजीराजे भोसले यांनी ‘न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा!’ असे ट्विट करत मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

Political Maharashtra

HomeNews

‘न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा!’; मराठा आरक्षणावर संभाजी राजे यांची प्रतिक्रिया

Team Political Maharashtra

 by Team Political MaharashtraJuly 7, 20200SHARES

महाराष्ट्र सरकारने केलेल्या मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या सुनावणीकरिता विशेष निमंत्रित म्हणून संभाजीराजे सहभागी झाले. सुनावणीनंतर त्यांनी सोशल मीडिया द्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संभाजीराजे भोसले यांनी ‘न्याय्य हक्कासाठी लढू आणि जिंकू सुद्धा!’ असे ट्विट करत मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे.https://platform.twitter.com/embed/index.html?dnt=true&embedId=twitter-widget-0&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1280463556341714945&lang=en&origin=https%3A%2F%2Fpoliticalmaharashtra.com%2Fsambhaji-rajes-reaction-on-maratha-reservation-390%2F&theme=light&widgetsVersion=9066bb2%3A1593540614199&width=500px

ते म्हणाले,” प्रदीर्घ काळासाठी काळापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा लढा यापुढेही सुरूच राहील आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणी करिता पुढील तारीख दिली. माझी महाराष्ट्र शासनाला सूचना आहे की पुढच्या आठवड्यात किंवा त्याही पुढे होणाऱ्या आरक्षणासंदर्भात आरक्षणा संबंधित प्रत्येक सुनावणीला अधिक गांभीर्याने आपण सामोरे जावे सामोरे जायला पाहिजे तसेच जे कोणी विरोध करीत आहेत त्यांनी सुद्धा समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाला विरोध न करिता पाठिंबा दिला पाहिजे”

“तसेच  देशात सर्वात पहिले आरक्षण बहुजन समाजाला राजर्षी शाहू महाराज यांनी दिले तेच आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर राज्यघटनेत समाविष्ट केले त्या आरक्षणात मराठा समाज समाजाचा सुद्धा समावेश होतो प्रचंड त्यागातून मिळवलेल्या मराठा आरक्षणाला कोणीही विरोध करू नये मराठा समाजाला मिळालेले आरक्षण इतर पुणे इतर कोणाही समाजाचे हक्क हिरावून मिळाले नाही त्यामुळे बाकी सर्व समाज मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत फक्त काही लोक या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करून घेत आहेत त्यामुळे त्या सर्वांना माझी हीच विनंती असेल की तुझं माझं न करता व्यापक समाजहित यांनी जपावं आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखात सोबत राहत आलो आहोत यापुढेही तसेच राहू” असेही संभाजी राजे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button