breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मराठा आरक्षण गोलमेज परिषदेस उदयनराजे भोसले अद्यापही अनुपस्थित
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातारा येथे आज गोलमेज परिषद पार पडत आहे. या परिषदेला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह शिवेंद्र राजे हेसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगितलेले जात होते. मात्र, अद्यापही उदयनराजे भोसले या बैठकीस अनुपस्थित असल्याचे समजते. मराठा क्रांती मूक मोर्चा, मराठा ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्याकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते.