breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मशाल रथयात्रा काढणार

मुंबई – मराठा आरक्षणासाठी आता मराठा क्रांती मोर्चाकडून मशाल रथयात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद ते मुंबईतील आझाद मैदान अशी ही रथयात्रा असेल. २८ नोव्हेबरला ही मशाल रथयात्रा औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. कोपर्डी आणि शिवनेरी किल्ल्याच्या मार्गाने ही रथयात्रा मार्गक्रमण करेल, असे सांगितले जात आहे. मात्र, राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने राज्य सरकार या रथयात्रेला परवानगी नाकारण्याची शक्यता अधिक आहे.

यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्याची हाक देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे आता सरकार मराठा आंदोलकांचा रोष कसा हाताळणार, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तत्पूर्वी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणांसंदर्भात वक्तव्य केले. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button