breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मनसेशी युतीची शक्यता नाही – विनोद तावडे

मुंबई | महाईन्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) भूमिका प्रादेशिकवादाची असल्याने त्यांच्याबरोबर भाजपची युती होण्याची शक्यता नसल्याचे ज्येष्ठ भाजपनेते विनोद तावडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्याने हिंदूुत्ववादी मतदार त्यांच्यावर नाराज झाले असून त्यांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत गेल्यानंतर मनसेने आता प्रखर हिंदूुत्वाची कास धरली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर भाजप-मनसे युतीची चर्चा सुरू झाली आहे. पण भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून मनसेच्या प्रादेशिकवादाच्या भूमिकेमुळे भाजपचे नुकसान होईल. त्यामुळे मनसेबरोबर युती करू नये, असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button