breaking-newsUncategorized

आनंदनगर, चिंचवड स्टेशन परिसर सील, आयुक्तांचा‌ आदेश

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आनंदनगर, चिंचवड स्टेशन हा परिसर सील केला आहे.

आनंदनगर, चिंचवड स्टेशन (चिंचवड स्टेशन रोड – स्टार वेस्ट बेकरी – जुना मंबई पुणे हायवे – सदगुरु मॅक्स – कार्निव्हल सिनेमा मागची बाजू – प्रिमियर कंपनी मागील बाजू – मालधक्का भिंत – मालधक्का रोड – चिंचवड स्टेशन रोड) उपरोक्त सीमाभागामधील संपूर्ण भाग येथील सर्व संबंधित पोलिस ठाण्यांच्या अंकित असलेला सोबतच्या नकाशात दर्शविलेला परिसर (परिशिष्ठ १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ) बुधवारी, (दि . १३ मे २०२०) रोजी रात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे.

त्यानुसार सदर परिसरातील संबंधित पोलिस स्टेशन प्रमुख या भागाच्या हद्दी सील करतील, त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात येत आहे.

तथापि १) सदर आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने तसेच शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. २) उपरोक्त नमुद प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा बंद ठेवाव्यात व केवळ आपली ए. टी. एम. केंद्रे कार्यान्वीत ठेवावीत.

पुढील काळात शहरातील रमणांची संख्या विचारत घेता टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागांत देखील या प्रकारचे निबंध लागू करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी किमान सात दिवसांसाठी लागणारे जीवनाश्यक साहित्य गर्दी न करता प्राप्त करून घेऊन पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button