breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ः पुणेकरांचा पाणीपुरवठा बुधवार रात्रीपासून 24 तासांसाठी बंद

पुणे। महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पाणीपुरवठ्या संदर्भात पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बुधवारी रात्रीपासून पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून व गुरूवारी दिवसभर बंद राहणार आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बुधवारी रात्रीपासून पुणेकरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून व गुरूवारी दिवसभर बंद राहणार आहे. पर्वती, बिबवेवाडी, सहकार नगर, शिवाजीनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता यासह अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. 

लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील वानवडी इएसआर व हाय सर्व्हिस टाकी तसेच पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती एचएलआर येथे व एसएनडीटी एसएलआर येथे फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र, शुक्रवार 16 सप्टेंबरपासून सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणी पुरवठा बंद

वानवडी गाव, फातिमानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचा संपूर्ण भाग, संपूर्ण डिफेन्स एरिया विभागाचा भाग, सोलापूर रोडच्या दोन्ही बाजू रामटेकडी चौकापर्यंत, सोपान बाग, उदय बाग, डोबरवाडी कवडे मळा संपूर्ण परिसर, बी.टी. कवडे रोड व संपूर्ण परिसर, पर्वती HLR, पर्वती गाव, सहकारनगर संपूर्ण, तावरे कॉलनी, आदर्श नगर, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट, वाळवेकर नगर, संतनगर, नव महाराज सोसायटी, सारंग सोसायटी, मित्रमंडळ कॉलनी, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एसबीआय कॉलनी, अरण्येश्वर, कोंढवा, बिबवेवाडी, अप्पर- बिबवेवाडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी ओटा, महेश सोसायटी, कात्रज कोंढवा, गंगाधाम परिसर, डायस प्लॉट, महर्षीनगर, सॅलिसबरी पार्क, संदेशनगर, मीरा सोसायटी, एसटी कॉलनी, स्वारगेट, संभाजीनगर धनकवडी (चव्हाणनगर), अप्पर, इंदिरानगर, कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर, कोंढवा गावठाण, स.नं. ३५४, मोरे चाळ, गव्हाणे चाळ, भाग्योदयनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, साईबाबानगर, स.नं. ४२,४३, युनिटी पार्क, ज्ञानेश्वर नगर, सवेरा पार्क परिसर. शिवाजीनगर परिसर, भांडारकर रोड,बी.एम.सी.सी. रोड, रेव्हेन्यू कॉलनी, गोखलेनगर, मॉर्डन कॉलनी, वैदुवाडी, पत्रकारनगर, पांडवनगर, भोसलेनगर, खैरेवाडी, जनवाडी, सेनापती बापट रोड, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, तेजसनगर, कोथरूड गावठाण, जोग शाळेजवळील भाग, भेलकेनगर, गुजरात कॉलनी, सुतार दवाखान्या मागील परिसर, गाडवे कॉलनी, परमहंस नगर, सुतारदरा, रामबाग, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, गुरुराज सोसायटी, इन्कमटॅक्स कॉलनी, वनाज परिसर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, जय भवानी नगर, किस्किंदा नगर, एम.आय.टी. कॉलेज परिसर, प्रभाग ३१ चा वडार वस्ती, स्टेट बँक नगर, हैप्पी कॉलनी, पृथ्वी हॉटेल परिसर, मेघदूत सोसायटी.

पुण्याच्या या सर्व परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button