breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौरपदी राहूल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड

  • जाधव यांचा 80 मतांनी विजय
  • चिंचवडे यांना मिळाली 79 मते

पिंपरी – शहराच्या महापौरपदी जाधववाडी प्रभागाचे नगरसेवक राहूल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांनी 80 मते मिळवून राष्ट्रवादीचे उमेदवार विनोद नढे यांचा पराभव केला. जाधव यांना अपक्ष पाच आणि मनसेचे सचिन चिखले यांचेही मतदान मिळाले. तर, उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी 79 मते मिळवून राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांचा पराभव केला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली होती.

 

नितीन काळजे आणि शैलजा मोरे यांनी राजीनामे दिल्यानंतर महापौर, उपमहापौर पदासाठीची निवडणूक आज शनिवारी (दि. 4) विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहिले. सभेचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवत मतदान घेण्यात आले. एकूण नगरसेवक 128 असले तरी सभागृहात 113 जणांनी मतदान केले. महापौर पदाचे भाजपचे उमेदवार राहूल जाधव यांना 80 मते मिळाली. मनसे नगरसेवक सचिन चिखले, अपक्ष अघाडीच्या पाच नगरसेवकांचेही त्यांना मतदान मिळाले. तर, सात नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा सहभाग होता.

 

उपमहापौर पदासाठी सचिन चिंचवडे यांनी भाजपतर्फे तर विनया तापकीर यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरले होते. अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ देण्यात आली होती. मतदान कमी असताना देखील तापकीर यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. प्रथम सचिन चिंचवडे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावर चिंचवड यांना 79 मते मिळाली. तर, तापकीर यांना 32 मते मिळाली. सभागृहात 120 सदस्य उपस्थित होते. त्यातील 111 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळीही शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली होती. सचिन चिंचवडे यांचे मताधिक्य असल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड घोषीत करण्यात आली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, डबू आसवानी आणि नगरसेविका सुलक्षणा धर अनुपस्थित होते. दरम्यान, महापौरपदी डावलले गेल्यामुळे भाजपचे शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित राहिले. तर, कौटुंबिक कारणास्तव भाजपचे तुषार कामठे सभेला येऊ शकले नाहीत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button