breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेच्या भगव्या वादळाला सुरवात…

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने काढण्यात येणा-या महामोर्चाला सुरवात झाली आहे . हिंदू जिमखान्यापासून सुरु होणारा मोर्चा आझाद मैदानावर येऊन धडकणार असून पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होणार आहे…

मनसेच्या महाअधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या महामोर्चाची घोषणा केली होती. देशप्रेमींनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले असून राज्यातूनच नाही तर देशभरातून काही हिंदू संघटना देखील या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

मनसेने  या मोर्चाची जय्यत तयारी केली असून आझाद मैदानावर २ लाख लोक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी साडे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे कृष्णकुंजवरुन निघणार असल्याची माहिती आहे. हिंदू जिमखाना- मरिन लाईन- पारशी गल्ली-मेट्रो जंक्शन- आझाद मैदान असा या महामोर्चाचा मार्ग असेल. मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्ताची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button