breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपुणे

मनसेच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील यांना पुण्यात अटक

पुणे: शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याप्रकरणी मनसेच्या महिलाध्यक्षा व माजी नगरसेविका ॲड. रुपाली ठोंबरे पाटील यांनी गेट चढून आंदोलन केले होते. तसेच विभागीय आयुक्तांना याप्रकरणी जाब विचारलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी ठोंबरे पाटील यांना अटक केली आहे. पुण्यात जंबो रुग्णालयात रूग्णांची होणारी हेळसांड आणि त्या पार्श्वभूमीवर ॲड. रूपाली पाटील ठोंबरे यांनी केलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर केलेली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करत मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुरुवारी मनसे स्टाईल आंदोलन करीत थेट गेटवरुन चढून जम्बो सेंटरमध्ये प्रवेश केला. विभागीय आयुक्तांनाही त्यांनी यावेळी रुग्णांच्या हेळसांड होत असल्याबद्द्ल जाब विचारला. जम्बो कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुना वैद्यकीय व्यवस्था तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केलेली होती.

जम्बो सेंटरमधील नियोजनाच्या अभावामुळे तसेच पीएमआरडीए आणि पालिकेमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूमुळे अन्य रुग्ण घाबरले असून येथील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरही घाबरले असल्याचे पाटील म्हणाल्या. जम्बो सेंटरची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पाटील यांना गेटवरच बाऊन्सरने अडविले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे ॠषीकेश बालगुडे व अन्य कार्यकर्ते होते. बाऊन्सर आतमध्ये सोडत नसल्याने त्यांनी थेट गेटवर चढून आतमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ सर्व कार्यकर्ते आतमध्ये गेले.

त्यावेळी विभागीय आयुक्त राव जम्बोमध्ये बैठक घेत होते. त्यांच्याकडून माहिती घेत पाटील यांनी यंत्रणांमधील असमन्वय दूर करावा, रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे, त्यांना आनंदी वाटेल असे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी राव यांनी कार्यकर्त्यांना उपाययोजनांबद्द्ल माहिती दिली. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन जम्बो कोविड सेंटरमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. पीएमआरडीए आणि पालिकेमध्ये समन्वय घडविण्यासोबतच रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देणे, रुग्णवाहिकेची आणि मनुष्यबळाची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button