breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मध्य रेल्वेवर सहा वातानुकूलित उपनगरी गाडय़ा?

दीड वर्षांत बारा एसी लोकल मुंबईत येणार; मध्य रेल्वेवर चाचण्ी करून सेवा चालवण्याचा निर्णय

मुंबई : पुढील एक ते दीड वर्षांत येणाऱ्या भेल कंपनीच्या १२ वातानुकूलित लोकलपैकी सहा लोकल मध्य रेल्वेवर टप्प्याटप्प्यात दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरही वातानुकूलित लोकलसाठी मार्ग मोकळा झाला आहे.  यातील एक गाडी एप्रिलपर्यंत आणि तीन गाडय़ा सप्टेंबपर्यंत व दोन डिसेंबपर्यंत मुंबईत दाखल केल्या जातील.

पश्चिम रेल्वेवर २५ डिसेंबर २०१७ रोजी वातानुकूलित लोकल धावली. तत्पूर्वी ही लोकल मध्य रेल्वेवर चालवण्यात येणार होती. मध्य रेल्वेवर दाखल होताच त्याची चाचणीही घेण्यात आली; परंतु छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान असलेल्या उड्डाणपुलांची उंची आड आल्याने ही योजना मध्य रेल्वेला गुंडाळावी लागली. त्यानंतर पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल चालवण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये नाराजी होती. परंतु आता मध्य रेल्वे प्रवाशांची प्रतीक्षा संपणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्लादरम्यान असलेल्या पुलाच्या उंचीनुसार वातानुकूलित गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान उंचीचा मुद्दा तरी हद्दपार झाला आहे. इतर तांत्रिक अडचणी या गाडीची मध्य रेल्वेवर चाचणी घेतल्यानंतर लक्षात येतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

एप्रिल, २०१९ मध्ये पहिली गाडी मुंबईत

’ २०१९ मध्ये भेल (भारत हेवी इलेक्ट्रिल लिमिटेड) कंपनीच्या बारा वातानुकूलित लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील कारखान्यात केली जाणार आहे. यातील एक गाडी एप्रिल २०१९ पर्यंत आणि तीन गाडय़ा सप्टेंबपर्यंत व दोन गाडय़ा डिसेंबपर्यंत मुंबईत दाखल केल्या जातील.

’ २०२० पर्यंत वातानुकूलित लोकलची संख्या आणखी वाढवण्यात येईल. रेल्वे बोर्ड सहा वातानुकूलित लोकल मध्य रेल्वेला देण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले.

’ चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात बारा वातानुकूलित लोकलची बांधणी होणार असली तरी अद्याप त्याचे साहित्य संबंधित कंपनीकडून उपलब्ध झालेले नाही. तरीही एप्रिलपर्यंत मुंबईत एक लोकल पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर उर्वरित लोकलच्या बांधणीला वेग येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button