breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पत्नीच्या औषधासाठी घोड्यावर बसून वृद्धाने अक्कलकोटमधून गाठले सोलापूर

सोलापूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. पुणे आणि मुंबई येथून लोक दुचाकी, सायकल चालवत घर गाठत आहेत हे आपण पाहत आहोत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ गावातील दस्तगीर पठाण या वृद्धाने तर शुक्रवारी चक्क पत्नीची औषधे आणण्यासाठी घोड्यावर बसून सोलापूर शहर गाठले.

सार्वजनिक वाहतूक, खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे घोड्यावरून सोलापूर गाठल्याचे पठाण यांनी सांगितले. पत्नीची रक्तदाबाची औषधे संपल्याने आणि तालुक्यात ती औषध मिळत नसल्याने घोड्यावरून औषध खरेदीसाठी सोलापूर शहरात आल्याचे पठाण म्हणाले. पठाण यांचं हे पत्नीप्रेम पाहून सारेच थक्क झाले.

एसटी बससेवा तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही बंद असल्याने त्याचा मोठा फटका दस्तगीर पठाण यांना बसला. मात्र, पठाण यांनी शक्कल लढवून यावर मात केली. त्यांनी चक्क घोड्यावर स्वार होत पत्नीसाठी औषधे आणण्यासाठी सोलापूर गाठल्याने सगळ्यांनीच त्यांच्या जिद्दीला दाद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button