breaking-newsराष्ट्रिय

Assembly elections : काँग्रेसच्या SC-ST आमदारांच्या संख्येत दुपट्टीने वाढ

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन आला आहे. काँग्रेससाठी एक मोठी गोष्ट अशी आहे की, या राज्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित जागांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये काँग्रेसच्या हिश्यात दुपट्टीने वाढ झाली आहे. तर २०१३च्या तुलनेत भाजपाच्या हिश्यातील या जागांमध्ये घट होऊन अर्ध्या राहिल्या आहेत.

रात्री उशीराच्या अंदाजानुसार, या तीन राज्यांमध्ये एससी-एसटीसाठी आरक्षित १८१ जागांमध्ये काँग्रेस १०८ जागांवर आघाडी घेतली होती. २०१३ मध्ये ४२ जागांच्या तुलनेत ही वाढ दुपट्टीहून अधिक आहे. तर, भाजपा यामध्ये केवळ ५९ जागांवर पुढे होती. या जागांवर भाजपाच्या एकूण १२८ प्रतिनिधींच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. दलित हक्कांशी संबंधीत संस्था मानतात की, एससी-एसटींच्या जागांवर भाजपाला झालेल्या या मोठ्या नुकसानीचे कारण केंद्र आणि राज्यांमध्ये भाजपा सरकारांद्वारे या वर्षी २ एप्रिलला आयोजित भारत बंदला चुकीच्या पद्धतीने हाताळणे कारणीभूत ठरले आहे. हे आंदोलन आणि बंद एससी-एसटी अॅक्ट अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात करण्यात आले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशात झालेल्या निदर्शनादरम्यान या समाजाच्या शेकडो लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान १० लोकांचा मृत्यूही झाला होता.

दोन राज्यांमध्ये भाजपाच्या जागांच्या वाटपातही मोठे नुकसान झालेले पहायला मिळाले. राजस्थानबाबत बोलायचे झाल्यास इथे एकूण ३३ एससी आरक्षित मतदारसंघात भाजपाचे ३१ आमदार होते. यात आता घट होऊन एक तृतीयांश म्हणजेच १० राहिले आहेत. तर काँग्रेसकडून या जागांवर एकही आमदार नव्हता. शेवटच्या कलांनुसार, काँग्रेस २० एससींच्या जागेवर पुढे होती. हीच स्थिती मध्य प्रदेशातही होती. एससींच्या आरक्षित जागेवर आजवर काँग्रेसचे ४ आमदार होते. आता इथे काँग्रेसच्या एससी आमदारांच्या संख्येत वाढ होऊन ती ४ पट होऊ शकते.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे की, अनुसुचित जाती-जमातींच्या मतदारांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानात पूर्णपणे भाजपाच्या विरोधात जात काँग्रेसला मतं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी आपल्या भाषणांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत दलितांची मतं जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी या समाजात अंतर्गतदृष्ट्या असंतोष असल्याने भाजपाला त्याचा फटका बसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button