breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात केळीचे भाव गडगडले; जनावरांचे खाद्य म्हणून होतोय उपयोग

भोपाळ : उत्पादन किंमतीपेक्षा अधिक प्रमाणात भाव घसरल्याने मध्य प्रदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची वेळ आली आहे.

साधारणपणे १० क्विंटल केळी उत्पादनासाठी जवळपास ८ हजार रुपये खर्च लागतो. तर दुसऱ्या बाजूला घाऊक व्यापारी ५०० रु. प्रति ट्रॉली (१० क्विंटल) असा भाव देत आहेत. तर माल चढवणे आणि उतरवणे यासाठी मजुरी खर्च यापेक्षा अधिक लागत आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

व्यापारी आणि मध्यस्थ हे शेतकऱ्यांविरुद्ध कट रचत असून ऐन हंगामात ते उत्पादनाचा भाव पाडत आहेत, असा आरोप शेतकरी करत आहेत. दरम्यान, यामुळे तेथील राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button