breaking-newsमहाराष्ट्र

हायप्रोफाईल सेक्स, ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

  • रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी * ५ महिलांसह  ९ जण अटकेत , ७ मुलींची सुधारगृहात रवानगी

अलिबाग : एका हायप्रोफाईल सेक्स  आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय . याप्रकरणी ५ महिलांसह ९ जणांना पोलीसांनी अटक केलीय.  वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ७ मुलींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली आहे. यामध्ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्या्ची  माहिती मिळाली आहे .

महत्वाचे म्हणजे आरोपींकडे २६  ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्या ची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते . अलिबागच्या किनारपटटी भागातील बंगले भाडयाने घेवून अशा प्रकारे देहव्यवसाय आणि अंमली पदार्थाचा व्यापार चालत असल्यााची माहिती पोलीसांना मिळाली होती . त्या्नुसार पोलीसांनीच मोठया खुबीने या क्षेत्रात काम करणाऱ्या राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांचे मोबाईल नंबर मिळवले . त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठराविक रक्ककम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितली . त्यानंतर या दोघींनी त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलींची नाव कळवून सौदा निश्चित केला . त्याप्रमाणे काल रात्रीसाठी दोन बंगले ऑनलाईन बुक करण्यात आले . तेथे  अशा पार्टीचे आयोजन करण्यात आले  .

तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडे पैसेही देण्यानत आले .या बोगस गिऱ्हाईकाकरवी या रॅकेटचा भांडाफोड केला .

महिला पोलीसांनी राखी नोटानी व  रंजिता सिंग यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २६ ग्रॅम कोकेन आढळून आले . राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु,  राजकमल,  निकेश मोदी,  वरुण अदलखॉ,  सईद अमीर रज्जाक , सिमा सिंग, श्रुती गावकर,आरोही सिंग अशी या गुन्हरयातील आरोपींची नावे आहेत . त्यांच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधि नियम तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वेये गुन्हा  दाखल करून त्याना अटक करण्या त आली आहे.

आज या सर्व आरोपींसह देहव्यापारासाठी आलेल्या ७ मुलींना अलिबाग न्यायालयासमोर हजर केल्यानंतर  या मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे .

पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्यार मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख , सहायक पोलीस निरीक्षक  मेघना बुरांडे, पोलीस उपनिरीक्षक बुरुंगळे व २५ पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button