breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मध्य प्रदेशातही शिवसेना भाजपविरोधात उभी ठाकणार

भोपाळ – महाराष्ट्रात युती तोडून वेगळा संसार थाटणाऱ्या शिवसेनेने भाजपची दमछाक करायचे ठरवले आहे. त्यासाठी शिवसेनेने बिहार निवडणुकीसाठीही आपला उमेदवार उभा केला असून आता त्यांनी आपला मोर्चा मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीतही वळवला आहे.

मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी शिवसेनाही आपले उमेदवार उभे करणार आहे. 3 नोव्हेंबरला हे मतदान होत असून महाराष्ट्रातून शिवसेनेचे काही नेते प्रचाराला जाण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसच्या 27 आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक पार पडत आहे. तसंच एका आमदाराचा मृत्यू झाल्याने त्या जागेवरही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे हिंदुत्त्ववादी विचारांच्या मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला होणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल. बिहारमध्ये सुमारे 50 जागा लढवत असताना मध्य प्रदेशातही 28 जागा लढवून राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवण्याचा शिवसेना नेतृत्त्वाचा प्रयत्न आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button