breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

न्यूज चॅनल्सच्या रेटिंगला तीन महिने स्थगिती, BARC चा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली – टीआरपीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी चॅनेल्सवर कारवाई करण्यात येत असतानाच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल अर्थात BARC ने मोठा निर्णय घेतला आहे. पुढचे ३ महिने म्हणजेच १२ आठवडे कोणत्याही चॅनेलचे रेटिंग्ज जारी करण्यात येणार नाही. बीएआरसी बोर्डाने प्रस्ताव दिला आहे की त्यांची टेक्निकल कमिटी सध्या असणाऱ्या स्टँडर्ड्सचे पुनरावलोकन करेल. सध्याची सिस्टिम आणखी चांगली करण्याचा यामागे हेतू आहे. यामध्ये सर्व हिंदी, प्रादेशिक, इंग्रजी बातम्या आणि बिझनेस न्यूज चॅनल्सचा समावेश असेल. याकरता 8 ते 12 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

BARCच्या या महत्त्वाच्या निर्णयाचे नॅशनल ब्रोडकार्स्टर्स असोसिएशन (NBA) ने स्वागत केले आहे. एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी असे म्हटले आहे की, असा महत्त्वाचा निर्णय घेताना बीएआरसीने त्यांच्याकडून सल्ला घेणे आवश्यक होते.

बीएआरसीच्या टेक्निकल कमिटीच्या पर्यवेक्षणाअंतर्गत व्हॅलिडिएशन आणि टेस्टिंग केले जाणार आहे. बीएआरसी न्यूज चॅनल्सचे राज्य आणि भाषेनुसार Weekly Audience Estimate जारी ठेवेल.

BARC चे चेअरमन पुनीत गोएंका म्हणाले की, ‘अगदी अलिकडीच्या घडामोडी लक्षात घेता, बीएआरसी बोर्डाचे मत होते या निर्णयाची गरज होती. कारण इंडस्ट्री आणि बीएआरसीने आधीपासूनच्या कडक प्रोटोकॉलचा आढावा घेण्यासाठी बारकाईने काम करणे गरजेचे आहे. तसंच उद्योगाच्या वाढीसाठी आणि चांगल्या स्पर्धात्मकतेसाठी सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button