मद्यपानामुळे दरवर्षी जगभरात 28 लाख लोक मरण पावतात…
ह्यूस्टन (अमेरिका) – जगभरात दरवर्षी सुमारे 28 लाख लोक मद्यपानामुळे मरण पावतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. मद्यपानामुळे कॅन्सर, हृदयरोग, रस्त्यावरील अपघात आणि टीबी बळावल्यामुळे मद्यपान करणारे मरत असल्याचे या संशोधनात दिसून आलेले आहे.
मर्यादित वा अल्प प्रमणात मद्यपान केल्याने आरोग्य सुधारते याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे आणि प्रासंगिक मद्यपानही आरोग्याला हानिकारक असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. सिएटल येथील वॉशिंग्टन युनिव्हरर्सिटीच्या एका संशोधन प्रकल्पात जगभरातील आजार आणि मृत्यूची कारणे यांचा व्यापक अभ्यास करण्यात आला होता, या बाबतचा अहवाल लॅन्सेट मेडिकल जर्नल मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावर आधारित ग्लोबल बर्डन ऑफ डोसीजेस स्टडीज च्या पुस्तकाच्या लेखकांनी म्हटले आहे, की सरकारने लोकानी मद्यपान बंद करण्याचा आग्रह धरावा.
स्न 2016 मध्ये मद्यपानामुळे 28 लाख लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे. 15 ते 49 या वयोगटातेल अकाली मृत्यू आणि अपंगत्व यांच्या कारणात मद्यपान हे एक मोठे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. शंभरावर संशोधकांनी हजारो प्रकरणांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेले आहेत.