breaking-newsराष्ट्रिय

मेजर लितुल गोगोई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली : गेल्या वर्षी जम्मू- काश्मीरमध्ये एका तरुणाला जीपला बांधून त्याचा मानवी ढाल म्हणून वापर करणारे मेजर लितुल गोगोई पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. या प्रकरणी जम्मू- काश्मीर पोलीस आणि सैन्याने स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे.

मेजर लितुल गोगोई यांनी श्रीनगरमधील हॉटेल ग्रँड ममतामध्ये एक रुम बुक केली होती. हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांच्यासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. ओळखपत्र तपासले असता ती बडगामची रहिवासी असल्याचे समोर आले. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांच्या मार्फत चौकशी सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले तर सैन्यानेही या प्रकरणाची चौकशी केली सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button