breaking-newsमुंबई

उपनगरी रेल्वेच्या प्रवासी उत्पन्नात अवघ्या २९ कोटींची भर

  • मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर दोन वर्षांत मोठी आर्थिक वाढ नाही

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील उत्पन्नात गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ झालेली नसल्याचे समोर आले आहे. अवघ्या २९ कोटी ७८ लाखांहून अधिक रुपयांची भर उत्पन्नात पडली आहे.

उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त अशी परिस्थिती सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेची आहे. मध्य व पश्चिम रेल्वेला मिळणाऱ्या प्रवासी उत्पन्नातूनही फारसा फायदा मिळत नाही. मध्य रेल्वेवर सध्याच्या घडीला दररोज ४१ लाख, तर पश्चिम रेल्वेवर जवळपास ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. यातही शहरी रेल्वे स्थानकांतील प्रवासी संख्या कमी होत असून उपनगरीय स्थानकांतील प्रवासी संख्येत थोडीफार वाढ होताना दिसते. तरीही उत्पन्न काही केल्या वाढत नाही.

मध्य रेल्वेला २०१६-१७ मध्ये उपनगरीय सेवेतून ८४४ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. २०१७-१८ मध्ये अवघ्या दहा कोटी रुपयांची भर पडली असल्याची माहिती देण्यात आली.

पश्चिम रेल्वेलाही २०१७-१८ मध्ये ८२५ कोटी ५२ लाख ९ हजार ७४५ रुपये उत्पन्न मिळाले आणि यामध्ये साधारण १९ कोटी ७८ लाख ५१ हजार रुपयांची भर पडल्याचे सांगण्यात आले. एकूण साधारण २९ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवनव्या शक्कला लढविल्या जात आहेत.

स्थानकांची गर्दी ओसरतेय

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी या स्थानकांतील, तर मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, दादर, भायखळा, विक्रोळी, भांडुप स्थानकांतील गर्दी ओसरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button