breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मतदार यादीतील दुबार नावे वगळा – सचिन साठे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार यादीत बावन्न हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. अशी सर्व दुबार नावे ताबडतोब वगळावीत व सुधारीत मतदार यादीनुसारच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका घ्याव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. तसे पत्र साठे यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना गुरुवारी दिले.
राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांची मतदार यादी वेबसाईटवर जाहिर केली आहे. या यादीबाबत साठे यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघात 8 कोटी 44 लाखांहून जास्त मतदार असल्याचे वेबसाईटवर दिसते. यापैकी सुमारे 44 लाख 61 हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात अनेक नावे दुबार असल्याचे दिसते.
मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी विधानसभा व चिंचवड विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी विधानसभेचा समावेश आहे. या तीनही विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत पिंपरी – 9453, चिंचवड – 22404 आणि भोसरी – 20674 अशी एकूण 52531 मतदारांची दुबार नावे आहेत. हा तपशील साठे यांनी पत्रासोबत जोडला आहे. निवडणूका लोकशाही पध्दतीने होत असताना हे अतिशय गंभीर असल्याचे साठे यांनी म्हटले आहे. यासाठी अशी दुबार नावे निवडणूकांच्या आधी मतदार यादीतून वगळावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मयूर जयस्वाल उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button