breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा साफ करणा-या महिला देशाच्या स्वच्छता दूत  – अनुराधा गोरखे 

– महिलांच्या आरोग्याच्या तक्रारींवर मार्गदर्शन
पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्यासाठी जागरूक रहायलाच हवे, आरोग्यदायी जीवन ही प्रत्येक यशाची गुरूकिल्‍ली असते. अनभिज्ञता, दुर्लक्षपणा यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. साधारणत: चाळीशीनंतर महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी सुरू होतात.  या तक्रारींवर योग्य उपचार, सल्‍ला असेल तर आयुष्याची दुसरी टर्मही सुखावह व आनंदी जगता येते. रस्त्यावरील कचरा साफ करणा-या महिला ख-या देशाच्या स्वच्छता दूत आहेत,  असे मत अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी  व्यक्त केले.
दत्तनगर, लालटोपीनगर, विद्यानगर परिसरात  जागतिक महिलादिनानिमित्त  साफ सफाई करणा-या महिला कर्मचा-यांचा सत्कार साडीचे वाटप देऊन करण्यात आला.  गेल्या दहा वर्षात येथे  काम करणा-या साफसफाई कर्मचारी महिलांचा सत्कार कोणी केला नाही. यावेळी महिलांच्या आरोग्याबाबत अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी  भाजपच्या अनुसूचित महिला आघाडी प्रमुख कोमल शिंदे,  अश्विनी पात्रे, अनिता कांबळे उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करायला हवी.महिला कुटुंबाचा कणा आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. महिला सुदृढ राहिल्या तरच कुटुंब सुदृढ राहील. म्हणून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक आजार हे किरकोळ दुखणे आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. महिलांनी आरोग्य संपदेबाबत जागरूक राहिले पाहिजे.धकाधकीच्या जीवनात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी आपल्या आरोग्याबाबत नि:संकोचपणे डॉक्‍टरांशी बोलले पाहिजे. मोकळपणाने समस्या मांडल्या, तर त्यावर मात करता येईल. या प्रक्रियेतून नैराश्‍यदेखील कमी होईल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button