breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

साधूंच्या हत्येप्रकरणी १०१ जणांना पोलीस कोठडी

पालघर | पालघर येथील दोन साधूंसह तीन जणांच्या झालेल्या हत्येप्रकरणी १०१ आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डहाणू न्यायालयाने त्यांना ही कोठडी सुनावली आहे.डहाणू येथील गडचिंचले येथे दोन साधूंसह तिघांची हत्या झाली होती. याप्रकरणी १०१ जणांना अटक करण्यात आली होती.

या सर्वांना आज डहाणू न्यायालयात आणण्यात आले होते. दुसऱ्या एका प्रकरणात याच आरोपींची चौकशी करायची असल्याने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत. साधूंना वाचवताना पोलिसांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरा गुन्हा खूनाचा आणि तिसरा गुन्हा आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button