breaking-newsआंतरराष्टीय

संयुक्तराष्ट्रांची मानवाधिकार संघटना गटारगंगा झाली

  • कामकाज पद्धतीवर टीका करीत अमेरिका पडली बाहेर 

वॉशिंग्टन – अमेरिकेने संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार कौन्सिलच्या कारभारावर सडकून टीका करून त्यातून बाहेर पडण्याचा महत्वाचा निर्णय आज घोषित केला आहे. त्यामुळे मोठीच खळबळ माजली आहे. ही संघटना पक्षपातीपणे कारभार करीत असून ती केवळ राजकारण करीत आहे. त्यामुळे या संघटनेची गटारगंगा झाली असून मानवाधिकाराची त्यांनी थट्टाच करण्याचे काम सुरू केल्याने आम्हाला अशा संघटनेत काम करण्यात स्वारस्य राहिलेले नाही असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेच्या संयुक्तराष्ट्रांतील राजदूत निक्की हॅले यांनी आज वॉशिंग्टन येथे माईक पॉम्पेओ यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेऊन हा महत्वाचा निर्णय घोषित केला. अमेरिका मानवाधिकाराचे संरक्षण करणारा देश आहे आणि तो तसाच कार्यरत राहील असे निक्षुन सांगताना संयुक्तराष्ट्रांची मानवाधिकार संघटना मात्र बजबजपुरी झाल्याची टीका त्यांनी केली. मेक्‍सिकोतून निर्वासित होऊन अमेरिकेत आलेल्या नागरीकांच्या मुलांनी आम्हाला आमच्या पालकांबरोबर अमेरिकेत राहण्याची अनुमती मिळावी अशी मागणी केली आहे. ती मागणी अमेरिकेने धुडकाऊन लावल्यानंतर संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने अमेरिकेवर टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेन या संघटनेतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

निक्की हॅले आणि पॉम्पओ यांनी सांगितले की आम्ही हा निर्णय आज एकाएकी घेतलेला नाही. गेले अनेक दिवस अमेरिकेकडून याविषयी विचारविनीमय सुरू होता. या मानवाधिकार संघटनेत बदल व्हावेत अशी अपेक्षा होती.

ज्यांनी खुद्द आपल्या देशातच मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे त्या देशांना या संघटनेत सदस्यत्व दिले गेले आहे त्यांची या संघटनेतून हकालपट्टी केली जाण्याची अपेक्षा होती पण ते झालेले नाहीं त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button