breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी विधानसभेवर भगवा फडकणार!; दत्ता साने यांचा विरोधकांना ‘धक्का’

  • नेते दत्ता साने यांचा विरोधकांना इशारा
  • राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे दिले संकेत

– अमोल शित्रे

पिंपरी, (महाईन्यूज) – मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वच महानगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड सुरू झाली असताना पिंपरी-चिंचवडमध्ये सुध्दा पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या आहेत. लवकरच साने राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियातून तशी पोस्ट व्हायरल होत असल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाविष्ठ गावातील चिखलीमधून दत्ता साने यांचे नेतृत्व झपाट्याने पुढे आले. समाविष्ट गावातील नागरिकांनी तीनवेळा नगरसेवक म्हणून साने यांना निवडून दिले. तिन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढविल्या. चिखली, जाधववाडीसह भोसरी विधानसभा मतदार संघात साने यांच्या नावाला मोठे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीटाची मागणी केली होती. पक्षाने नाकारले तरी त्यावेळी माजी आमदार विलास लांडे यांचा साने यांनी प्रचार केला होता. 2014 मध्ये मात्र, साने यांनी पक्षाला झुगारून आमदार लांडे यांच्या विरोधात उघडपणे प्रचार केला. त्यामुळे लांडे पराभूत होऊन अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा विजय झाला. साने यांचा लांडगे यांच्या विजयात मोठा वाटा आहे. परंतु, आज आमदार लांडगे आणि साने यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.

त्यातच 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाले. भाजपची लाट असताना दत्ता साने चिखली प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसल्यामुळे सत्ताधा-यांच्या विरोधात प्रबळ आणि हुशार विरोधी व्यक्तीमत्व म्हणून पक्षनेता पदी माजी महापौर योगेश बहल यांना संधी दिली गेली. मात्र, सत्ताधा-यांसोबत व्यावसायीक लागेबांधे साधत वर्षभरात पक्षाला रसातळाला पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. भाजपच्या विरोधात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचा एकही नेता धजावत नव्हता. असे वातावरण असताना निष्कलंक दत्ता साने यांनी महापालिकेच्या सभागृहासह सामाजिक पटलावर भाजपच्या विरोधात परखड भूमिका मांडली. उघडपणे भाजप विरोधात बोलणारा राष्ट्रवादीचा एकमेव नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. त्यातच त्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी पहिल्याच वर्षी पक्षश्रेष्ठींकडे इच्छु प्रकट केली होती. त्यांना डावलण्यात आले. त्यांच्यातील परखडपणाची किंमत कळाल्यानंतर दुस-याच वर्षी विरोधी पक्षनेता पद साने यांना देण्यात आले. एक वर्षात त्यांनी पक्षाला कमालीची एनर्जी मिळवून दिली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट कारभारावर परखड भूमिका मांडून पदाधिका-यांसह आयुक्त श्रावण हार्डीकर यांचे वाभाडे त्यांनी काढले. त्यामुळे काकांची इमेज एक परखड व्यक्तीमत्व अशी तयार झाली.

पक्षावर दबाव निर्माण करण्याचा ‘व्होरा’

एक वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर साने यांनी रितसर पध्दतीने पक्षाकडे राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी आगामी विधानसभा असल्यामुळे पदाचा पक्षाला आणि स्वतःला फायदा करून घेण्यासाठी दुस-या वर्षी देखील विरोधी पक्षनेते पदी राहण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. परंतु, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. आज त्यांनी शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांचे फोटो सोशल मीडियामधून व्हारल होत आहेत. त्यामुळे साने यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या आहेत. लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तथापि, उद्या पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडील विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यामुळे पक्षावर दबाव निर्माण करण्यासाठी अशी पोस्ट व्हायरल केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

“मी राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आदरनिय पवार साहेब आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माझे खूप प्रेम आहे. त्यांनी मला भरभरून दिले आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा विषयच मनात येत नाही. कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हारल केली असेल. मी राष्ट्रवादी सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही”.

दत्ता साने, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड मनपा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button