breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

भोसरीत रंगणार आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

  •  सम्राटदादा फुगे युवा मंचचा पुढाकार 
  • ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान रंगतदार सामने

पिंपरी । प्रतिनिधी

कै. वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी ‘आमदार चषक-२०२१’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘हाफ पिच’ प्रकारातील या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहे.सम्राटदादा फुगे युवा मंच आणि भोसरी ग्रामस्थ यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.

येत्या ३ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. भोसरी येथील मैदानात रंगणाऱ्या या सामान्यासाठी लाखोंचे बक्षीसही देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३ फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुनिल शेळके, आमदार सुनिल टिंगरे, आमदार निलेश लंके उपस्थित राहणार आहेत.
तसेच, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, डॉ. विनायक पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेचे थेट युट्यूब लाइव्हवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये आणि आमदार चषक , द्वीतीय पारितोषिक ७५ हजार रुपये आणि आमदार चषक, तृतीय पारितोषिक ५१ हजार रुपये आणि आमदार चषक, चतुर्थ पारितोषिक ३५ हजार रुपये आणि चषक व पाचव्या क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सलग चार षटकार, चार चौकार, तीन विकेट घेणारा खेळाडू आणि उत्कृष्ट फलंदाज, उकृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सागर साकोरे- 9922095171, वैभव वाळुंज- 9767628455, सूरज माने- 8668301717, अक्षय फुगे- 9689113013, नितीन फुगे- 7030253131 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button