breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत महिलांना मिळणार हक्काचे व्यासपीठ ; इंद्रायणी थडी जत्रेचे आयोजन

– आमदार महेश लांडगे यांची संकल्पना
पिंपरी ( महा ई न्यूज ) -शिवांजली सखी मंच आणि महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशनच्या वतीने भोसरीतील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून दि. 8 ते 11 फेब्रुवारीपर्यंत  ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजिका पूजा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, भाजपा महिला प्रदेश सचिव उमा खापरे, महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा स्विनल म्हेत्रे, शिक्षण मंडळ अध्यक्षा सोनाली गव्हाणे आदींसह माजी नगरसेविका उपस्थित होत्या. 
या इंद्रायणी थडीचे उद्घाटन महिला व बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे हस्ते शुक्रवारी (दि.8) होणार आहे.  यावेळी अमृता फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, श्वेता शालिनी, आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, उपहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पूजा लांडगे म्हणाल्या की, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांमधील अंगभूत गुणकौशल्य विकसित व्हावेत यासाठी कला, क्रिडा, संस्कृती, उद्योजकता, रोजगार, आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2019 पर्यंत ही जत्रा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर भरवण्यात येणार आहे.
याची पूर्व तयारी म्हणून भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध बचतगटांशी प्रभाग निहाय बैठका घेऊन गटचर्चा केली जात आहे. त्याव्दारे अधिकाधिक महिला बचत गटांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका महिला व बाल कल्याण विकास समितीच्या सभापती स्विनल म्हेत्रे यांनी पवना थडीच्या अनुभवातून इंद्रायणी थडीच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांव्दारे, महिलांनी स्वत: तयार केलेल्या उत्पादनांसाठी या जत्रेमध्ये स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बचत गटांच्या विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी या जत्रेचे आयोजन केले आहे, अशीही माहिती पूजा लांडगे यांनी दिली.
यामध्ये पहिल्यांदाच लहान मुलांसाठी बालजत्रा, महिलांसाठी भजन स्पर्धा, गावरान खाद्य महोत्सव, महिला आरोग्य शिबीर, फॅशन शो, डान्स स्पर्धा, महिला उद्योजकता मार्गदर्शन, होम मिनिस्टर कार्यक्रम, योग व झुंबा ऐरोबिक्स प्रशिक्षण महिलांसाठी पारंपरिक खेळ, बेरोजगार युवती व महिलांसाठी रोजगार मेळावा असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. यासाठी महिला बचत गटांनी नि:शुल्क स्टॉल बूक करावेत. तसेच, बचतगटांसाठी बचतगटांचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच समाविष्ट महिलांची नावे व मोबाईल क्रमांक द्यावेत. शितलबाग, भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्टॉल बूकिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत स्टॉल बूकिंग करता येतील. असेही संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
‘सन्मान स्त्री शक्तीचा, गौरव भारतीय संस्कृतीचा’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या इंद्रायणी थडी जत्रेमध्ये महिलांसाठी चार दिवस विविध पारंपारिक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याव्दारे दररोज लकी ड्रॉ आणि विशेष सहभागी झालेल्या महिला अथवा बचतगटांना बक्षीस देण्यात येणार आहे. दररोज सुमारे एक हजार बक्षीसांचे वितरण करण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणातून त्या स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. त्याला आणखी चालना देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सादरीकरण करुन जनजागृती करण्यात येणार आहे. रिव्हर यक्लोथॉनच्या माध्यमातून सुमारे सात हजार सायकलपटूंनी जगजागृती रॅली काढून इंद्रायणीच्या संवर्धनाचा संदेश दिला होता. तसेच, भोसरी व्हीजन-2020, राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरात राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि पूर्ण केलेल्या विकासकामांची माहितीही देण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक पूजा महेश लांडगे यांनी दिली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button