breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

शिवसेनेला धक्का! मुक्ताईनगरचा वचपा काढला माथेरानमध्ये; शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

मुंबई |

सत्ताधारी शिवसेनेनं विरोध बाकांवरील भाजपाला मुक्ताईनगरमध्ये राजकीय धक्का दिला. भाजपाच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं. या राजकीय घडामोडीला २४ तास लोटत नाही, तोच भाजपाने याचा वचपा काढला. भाजपाने माथेरानमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात उपनगराध्यक्षांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button