breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद

मुंबई – आयपीएलच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर आज सायंकाळी साडेसात वाजता हा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता.

दरम्यान, यंदाच्या मोसमात मुंबईने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात हार तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे हैदराबादला आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे आज हैदराबादचा संघ विजयी सुरुवात करण्यास आसुसलेला असेल तर मुंबईचा संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही बदल झालाच तर मार्को जेन्सनच्या ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला संधी मिळू शकते. तर हैदराबादचे गोलंदाज शानदार गोलंदाजी करत आहेत, मात्र आतापर्यंत फलंदाजांनी निराशा केली आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू केन विल्यमसन आणखीही पूर्ण फिट नाही. त्यामुळे तो बॅक बेंचवर बसून आहे. त्याला पूर्णपणे ठीक व्हायला आणखीही एक आठवडा लागू शकतो. अशातच आजच्या सामन्यात हैदराबाद संघात फलंदाजीमध्ये काही बदल दिसू शकतात. मनीष पांडे किंवा साहा या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button