breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीत मतदानासाठी आलेल्या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पिंपरी महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभर लोक मतदान करण्यास घराबाहेर पडत होते. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकाचा अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे. अब्दुल रहीम नूरमहम्मद शेख असं या ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते नेहमी मतदान कऱण्यासाठी बारामती ते भोसरी प्रवास करत असत. मात्र दुर्दैवाने त्यांचं निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रहीम नूर मोहम्मद शेख काही वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. “आज दुपारी मयत अब्दुल रहीम हे मतदान करण्यासाठी कुटुंबासोबत भोसरी येथील महात्मा फुले शाळेत आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान काही वेळाने मृत्यू झाला”, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अब्दुल रहीम गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरशी आजाराने पीडित होते. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button