breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीच्या गावठाणात होणार कबड्डी प्रशिक्षण केंद्र

महापालिका स्थायी समितीच्या सभेत मंजूरी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  भोसरी गावठाणातील प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व्हे नंबर 1 मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्या कामासाठी स्थायी समितीने आज ( मंगळवारी ) झालेल्या सभेत सुमारे 9 कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.  

भोसरीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे काम सुरु आहे. या केंद्राबरोबरच गावठाणात कबड्डी प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात येणार आहे. या केंद्रासह उर्वरीत कामे करण्यासाठी 8 कोटी 86 लाख 15 हजार 916 रूपये खर्च होणार आहे. या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. भोसरी येथे सर्व्हे क्रमांक एक मधील गावठाणाच्जया  मैदानालगत हे कबड्डी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे.

या कामासाठी 8 कोटी 22 लाख 53 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 7 कोटी 96 लाख 29 हजार 515 रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या.  सदरच्या कामास ठेकेदाराकडून 7 कोटी 96 लाख 29 हजार 515 पेक्षा 7.99 जास्त दराने निविदा प्राप्त झालेल्या आहेत. सन 2018-19 चे एस.एस.आर. दरानूसार प्राप्त निविदा स्विकृत योग्य दरापेक्षा 6.42 टक्के कमी येत आहेत. प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच 8 कोटी 59 लाख 91 हजार 913 अधिक  राॅयल्टी चार्जेस  24 लाख 76 हजार 353 मटेरियल, टेस्टींग चार्जेस 1 लाख 47 हजार 650 असे एकूण 8 कोटी 86 लाख 15 हजार 916 पर्यंत काम करुन घेण्यास आणि नियमानूसार व निविदेतील निविदा अटीप्रमाणे त्यावरील वस्तू व सेवा कर अदा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यापैकी बी. के. खोसे या ठेकेदाराने निविदा प्राप्त झालेली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button