breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका भिकारी; भोसरीतील रुग्णालय खासगी तत्वावर देणार

  • गुरूवारी (दि. 13) आयुक्त दालनात होणार बैठक
  • गोरगरिब नागरिकांना आरोग्य सेवा होणार महाग

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – तब्बल साडेसातशे बेड्सचे पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय चालविण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेची क्षमता असताना भोसरीत नव्याने सरु करण्यात येणारे अवघे 100 बेड्सचे रुग्णालय चालविण्यास मात्र, पालिका क्षमताहीन असल्याचे दाखवून भोसरीतील हे रुग्णालय खासगी तत्वावर देण्याचा घाट पालिकेतील सत्ताधारी भाजपने घातला आहे. त्याला आयुक्तांची साथ असल्याने यात बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात केली जात आहे.

भोसरीत महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक एकर भूखंडावर 100 बेड्सचे तीन मजली नवीन रुग्णालय बांधले आहे. रुग्णालयात 10 बेड्सचा आयसीयू विभाग आहे. उर्वरीत 90 बेड्स विविध विभागांत विभागले आहेत. बाह्य रुग्णांसाठी (ओपीडी) 11 खोल्या आहेत. चार शस्त्र दालने आहेत. रुग्णालयासाठी सर्जन, मेडिसीन, आस्थिरोग तज्ञ, प्लास्टिक सर्जन, युरो सर्जन, ऑण्को सर्जन, एंडोक्रायनोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजीस्ट, ऑण्कोलॉजिस्ट हे तज्ञ डॉक्टर्स भरण्यात येणार आहेत. ही पदे वर्ग एकची असल्याने अशी किमान 35 पदे भरणे अपेक्षीत आहे. मात्र, अशे तज्ञ डॉक्टर्स महापालिकेच्या शासकीय सेवेत येण्यास तयार नाहीत, असे स्पष्टीकरण वैद्यकीय विभागाने अहवालात दिले आहे.

अनेक अडचणी दाखवून हे रुग्णालय खासगी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या दालनात गुरूवारी (दि. 13) दुपारी चार वाजता अधिकारी व पदाधिका-यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हे रुग्णालय बाह्यस्त्रोताद्वारे कसे चालविले जाणार, याचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यंनी अधिकारी आणि भाजप पदाधिका-यांना पाठविले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button