breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडचे महापौर स्मशानात, नगरसेवक अंथरूणात

  • बोच-या थंडीमुळे नगरसेवक निद्रीस्त

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहूल जाधव हे पूर्वी रिक्षाचालक होते. रिक्षाचा ‘धंदा’ करण्यासाठी त्यांना पहाटे लवकरच उठावे लागत. त्यांची लवकर उठण्याची सवय शहराच्या विकासात सत्कार्णी लागत आहे. स्मशानभूमीची अवस्था पाहण्यासाठी ते पहाटे लवकरच उठून शहराचा दौरा करत आहेत. आज सकाळी आठ वजताच त्यांनी काळेवाडी, रहाटणी येथील स्मशानभूमीला भेट दिली. नगरसेवक अंथरुणात असतानाच महापौर स्मशानात जाऊ लागल्याने नगरसेवकांनी मात्र, संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सर्वच स्मशान भूमींची पाहणी करण्यासाठी महापौर जाधव यांचा दैनंदीन नित्यक्रम सध्या सुरू आहे. जवळपास 36 स्मशान भूमींना भेट देऊन ते प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. त्यापैकी जवळपास 22 स्मशान भूमींना त्यांनी भेट दिली आहे. मात्र, ते सकाळच्या बोच-या धंडीत स्थानिक नगरसेवक अंतरुणात असताना येत असल्यामुळे महापौरांच्या दौ-यात या नगरसेवकांना सहभागी होता येत नसल्याची त्यांची खंत आहे. आज सकाळी आठच्या सुमारास रहाटणी, काळेवाडी येथील स्मशानभूमीला त्यांनी भेटी दिली.

त्यावेळी ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन आणि नगरसेविका सविता खुळे यांनी त्याठिकाणी येण्याची तस्दी घेतली नाही. ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि नगरसेविका सुनिता तापकीर उपस्थित होते. काळेवाडीतील स्मशान भूमीमध्ये महापौर आले तेव्हा नगरसेवक विनोद नढे आणि निता पाडाळे उपस्थित नव्हत्या. त्यांना महापौरांकडून उपस्थित राहण्यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी कॉल घेतला नसल्याचे महापौरांच्या स्वीय सहायकाने सांगितले. त्यावर महापौरांनी यापुढे सर्व स्थानिक नगरसेवकांना मोबाईलद्वारे संपर्क साधावा अन्यथा त्यांना संदेश पाठविण्यात यावा, असे आदेश त्यांनी स्वीय सहायकाला दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button