breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई ते दिल्ली डिझेलच्या दरात आज मोठी वाढ…

मुंबई: कोरोनाच्या महासंकटात महागाईमुळे आधीच सर्वासामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे वाढलेले भाज्या आणि किराणाचे भाव आणि महागाईचा मोठा फटका बसत असतानाच आता इंधर दरवाढीच्या झळाही बसताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई आणि दिल्लीत डिझेलचे दर वाढलेले आहेत. मुंबईत पेट्रोल पाठोपाठ डिझेलनं ऐशी ओलांडली आहे. जुलै महिन्यात डिझेलच्या दरात आतापर्यंत 1.55 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचे दर स्थिर असून डिझेलच्या दराचा मात्र भडका उडालेला आहे.

दिल्लीत डिझेल 80.11 तर पेट्रोल 81.79 रुपये प्रति लिटर आजचा दर आहे. तर मुंबईत प्रती लिटरमागे ग्राहकांना पेट्रोलसाठी 87.19 तर डिझेलसाठी 80.11 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 82.10 तर डिझेल 77.04 रुपये प्रति लिटर मोजावे लागणार आहेत.पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची पाहणी केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button