breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

भिगवणजवळ दोन एसटी बसची धडक; अपघातात ४० प्रवासी जखमी

पुणे | महाईन्यूज

पुणे- सोलापूर महामार्गावरील भिगवण गावाच्या हद्दीत ठाणे उस्मानाबाद एसटी बसने पुणे नांदेड शिवशाही बसला धडक दिली. अपघातात ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.७) दुपारी २ वाजता घडली. प्रवाश्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे बस उजनीच्या पाण्यात पडता पडता वाचली.

भिगवण पासून ५०० मीटरवर हा अपघात घडला. अपघातात दोन्ही गाडीतील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला टेम्पो नादुरुस्त झाल्यामुळे उभा होता. महामार्ग प्रशासनाकडून याठिकाणी कोणताही सूचना फलक लावला नव्हता. त्याच वेळी एक इंडिका गाडी मुख्य रस्त्यावर थांबून दुसऱ्या वाहकाशी बोलत थांबला होता. दरम्यान सोलापूरकडे जाणाऱ्या शिवशाही बस क्र. (एमएच.१४ जीयु ०६४५ )या गाडीने ब्रेक लावण्याच्या प्रयत्नात कारला धडक दिली. पुण्याहून सोलापूरकडे त्याचवेळी जाणारी ठाणे उस्मानाबाद बस क्र. ( एमएच.१४ बी.टी.४५७६) ही शिवशाहीवर जोरात आदळली. बसमध्ये ६० प्रवासी होते. यातील बऱ्याच प्रवाश्यांना या अपघातात डोक्याला,डोळ्यांना आणि छातीला मार लागला. शिवशाही बस मधील प्रवाशांनाही मार लागला.

अपघात झालेल्या ठिकाणी उजनीचा पूल आहे. सध्या त्याखाली मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. मात्र बस ड्रायव्हरचे प्रसंगावधान आणि प्रवाश्यांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे पुढील प्रसंग टळला. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी मदतीला पोलीस पथक पाठवून जखमींना भिगवण येथील खासगी दवाखान्यात पोहोचविण्याचे प्रयत्न केले. शासनाची १०८ क्रमांकाची अँब्युलन्स डॉ.राजन सोनवणे यांच्यासह काही वेळातच उपलब्ध झाल्याने जखमीना तातडीने मदत मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button