breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात

उस्मानाबाद | सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. झिशान सिध्दिकी असं या तरुणाचं नाव आहे. तो सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेमीला भेटायला गेला होता. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले.

विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button