breaking-newsराष्ट्रिय

#Lockdown:स्विगी देशभरातील 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आता नोकऱ्यांवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. येत्या काही दिवसात देशभरातील 1100 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. कंपनीने ई-मेलद्वारे कपातीची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. त्याआधी स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती.

फूड डिलिव्हरी व्यवसायावर मोठा परिणाम
स्विगीचे सहसंस्थापक श्रीहर्ष माजेती यांनी सोमवारी (18 मे) एका पत्रात म्हटलं की, “फूड डिलिव्हरी व्यवसायावर खोल परिणाम झाला आहे आणि येत्या काही दिवसात हा परिणाम कायम राहिल. मात्र आगामी काळात हा व्यवसाय रुळावर येईल, अशी आशा आहे. परंतु आम्हाला आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आणि येत्या काळात कोणत्याही प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कपातीची गरज आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button