breaking-newsराष्ट्रिय

भारत-चीन तणावमुळे श्रीनगर-लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद

श्रीनगर : भारत आणि चीन यांच्यात LAC वर तणाव वाढल्यानंतर आता श्रीनगर-लेह महामार्ग बंद करण्यात आला आहे. सध्या संरक्षण मंत्री यांच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयात महत्त्वाची बैठक सुरु आहे. ज्यामध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफसह अनेक मोठे अधिकारी सहभागी उपस्थित आहेत. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या हिंसक झडपनंतर चीनचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चीनचे हेलिकॉप्टर या भागात अनेकदा येताना दिसत आहे. जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांना घेण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर येत असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनचे ४० हून अधिक सैनिक या हिंसक झडपमध्ये मारले गेले आहेत.

चीन सीमेवर चीनकडून अजून कोणतेही बदल झालेले नाहीत. मोठ्या प्रमाणात सैनिक येथे उपस्थित आहेत. संपूर्ण एलएसीवर अलर्ट आहे. दोन्ही देशाच्या सीमेवर तणावाचं वातावरण आहे.सरकारकडून अजून विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. संपूर्ण माहिती घेऊनच विस्तृत माहिती दिली जाते असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. सध्या सरकारचे प्रतिनिधी आणि सैन्याचे प्रतिनिधी यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button