breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर तक्रारदार महिलेने घेतले पेटवून

पिंपरी, (महा-ई-न्यूज) निगडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही म्हणून एका संतापग्रस्त तक्रारदार महिलेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीसमोरच रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेतून पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आला आहे.

अनिता गायकवाड (वय 50) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंत बांगर यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता कोणत्यातरी कारणास्तव निगडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी काही कारणास्तव नकार दिला. त्यावर शुक्रवारी सायंकाळी अनिता एका व्यक्तीबरोबर पोलीस आयुक्तालयात आल्या. मोठमोठ्याने आरडाओरड करू लागल्याने पोलीस कर्मचारी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

परंतु, त्यांची मोठमोठ्याने आरडाओरड सुरूच होती. आमची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात दाखल करून घेतली जात नसल्याचे कारण देऊन त्यांनी पिशवीतील रॉकेलची बाटली काढली. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याठिकाणी कार्यरत पोलीस कर्मचा-याने त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button