breaking-newsआंतरराष्टीय

भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रित संशोधन सुरु

नवी दिल्ली : भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रितपणे चार नवीन पद्धतीचा शोध घेत आहेत, ज्यामुळे कोरोनाचे निदान काही मिनिटात होऊ शकणार आहे. यासाठीच इस्रायलच्या वैज्ञानिकांचे एक पथक या आठवड्यात भारतात येणार आहेत.

भारत आणि इस्रायल मिळून ज्या चार पद्धतींचा अभ्यास करत आहेत. जर त्या यशस्वी झाल्या तर एक मोठं यश भारताला मिळू शकते.भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक जो शोध लावणार आहे. त्यामध्ये एकूण चार पद्धतींवर वैज्ञानिक अभ्यास करणार आहेत. यातील दोन कोरोना तपासणी आहेत. ज्यामध्ये काही मिनिटात कोरोनाचे निदान होऊ शकते. तर तिसरी पद्धत ही सर्वात वेगळी आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा आवाज ऐकून कोरोनाचे निदान केले जाणार आहे. तसेच चौथ्या पद्धतीत आपल्या श्वासातील सॅम्पल घेऊन रेडिओ वेव्हने कोरोनाचे निदान केले जाईल.

“इस्रायलचे वैज्ञानिक राजधानी दिल्लीच्या AIIMS येथे रिसर्च करणार आहेत. या पद्धतीने तपासणी करण्याची पहिली पद्धत इस्रायलमध्ये करण्यात आली आहे. आता शेवटची पद्धत भारतात केली जाणार आहे”, असं भारतातील इस्रायलचे राजदून रॉन मलकिन यांनी सांगितले.

30 मिनिटात कोरोनाचे निदान होणार

“कोरोना तपासणीच्या पहिल्या पद्धतीत पॉलीमिनो अॅसिडचा वापर केला आहे. ज्यामुळे केवळ 30 मिनिटात निदान होणार आहे. हे जर यशस्वी झाले तर एअरपोर्ट, मॉल कुठेही तुम्ही गेला तर तपासणी करुन तुम्हाला तेथे प्रवेश दिला जाऊ शकतो”, असं इस्रायलचे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी दानी गोल्ड यांनी सांगितले.

“तर दुसऱ्या पद्धतीत एक स्वस्त बायोकेमिकल तपासणी आहे. ही घरी सुद्धा केली जाऊ शकते. या पद्धतीतही 30 मिनिटात तुम्हाला कोरोनाचे निदान होणार आहे”, असंही दानी गोल्ड यांनी सांगितले.

फोनवर आवाज ऐकूनही कोरोनाचे निदान होणार

“तिसऱ्या पद्धतीत टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (AI) चा वापर करुन एखाद्या व्यक्तीचा फोनवर आवाज एकून कोरोना आहे की नाही याचे निदान केले जाऊ शकते”, असं दानी गोल्ड म्हणाले.

“तिसरी पद्धत ब्रेथ अॅनालायझर आहे. यामध्ये एक व्यक्ती ट्यूबमध्ये श्वास घेणार. त्यानंतर आम्ही ती ट्यूब एका मशीनमध्ये टाकणार, ज्यामध्ये टेराहर्टज रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि एक अॅल्गोरिथ्मचा वापर करुन कोरोनाची लागण आहे का नाही हे तपासू शकतो”, असं दानी गोल्ड यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button