breaking-newsआंतरराष्टीय

‘जैश’चे दहशतवादी हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्याच्या तयारीत

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेचे आठ ते दहा दहशतवादी भारतात आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. जम्मू काश्मीरातील हवाई दलाची तळ अतिरेक्यांच्या रडारवर असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीराला विशेष दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यासह सीमेवर तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांकडून भारतात घुसखोरीच प्रयत्न करण्यात आले. भारतीय लष्कराने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. दरम्यान, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. “५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. भारतात दहशतवादी घुसवण्यासाठी पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या शस्त्रसंधी उल्लंघनाचा कसा सामना करायचे ते आम्हाला ठाऊक आहे. कुठल्या जागेवरुन कशी कारवाई करायची ते आमच्या जवानांना ठाऊक आहे. आम्ही पूर्णपणे अलर्ट असून त्यांचे घुसखोरीचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची खबरदारी घेऊ,” अशी माहिती रावत यांनी दिली होती.

त्यात आता गुप्तचर यंत्रणांनी हवाई दलाच्या तळांवर जैश-ए-मोहम्मद आत्मघाती हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button